उस्मानाबाद/प्रतिनिधी- जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला तरी अतिशय अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे.त्यामुळे अद्याप कुठेही पाणी साठा झालेला दिसून येत नाही.परिणामी दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून पावसाळा चालू झाला म्हणून जनावरांच्या छावणी बंद केल्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना पश्चिम महाराष्ट्रातुन ४५००/- ते ५०००/- प्रति टन दराने चारा खरेदी करावा लागत आहे.अगोदरच दुष्काळाने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी यामुळे आणखी मोठ्या अडचणीत सापडत आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आपणास निवेदन करण्यात येते की बंद केलेल्या जनावरांच्या छावण्या तातडीने चालू करण्यात याव्या व इतर दुष्काळी उपाययोजना देखील चालू ठेवाव्यात किंवा शेतकऱ्यांना दावणीला चारा उपलब्ध करावा अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.चाऱ्याची उपलब्धता न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. 
यावेळी कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय साळुंके, जिल्हा बँकेचे संचालक विकास बारकूल, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष प्रवीण यादव, पं.स.उपसभापती भगवान ओव्हाळ, जि.प.सदस्य मदन बारकूल, सुरेश कोरे, बाजार समितीचे उपसभापती शिवाजी बाराते, माजी सभापती लक्ष्मणराव थोरबोले, उत्तमराव टेकाळे, धनंजय वाघमारे, जिल्हा बँकेचे माजी संचालक भागचंद बागरेचा, युवक तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, तात्यासाहेब देशमुख, अनंत बिक्कड, शिराढोणचे सरपंच पद्माकर पाटील, गणेश बारकूल, प्रणव चव्हाण, बाळासाहेब पवार, खंडेराव मैंदाड, अशोक इरपतगिरे, पवन म्हेत्रे, अनंत जेवे, लोंढे डी.एन, अनुपकुमार परदेशी यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.    
 
Top