उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मोहा (त.कलंब) के अशोक झोरी (६५) यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट दिसत असतानाही कळंब पोलिस खुनाचा गुन्हा दाखल करत नसल्याने मृताच्या नातेवाईकांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. कळंब पोलिसांनी मात्र न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, अशा प्रकारची माहिती दिली.
मृताच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहा शिवारात अशोक झोरी यांची शेती आहे. त्यांच्या शेजारच्या व्यक्तीबरोबर झोरी यांचा शेतीबाबत वाद होता. यावरून या दोन्ही कुटूंबात गेल्या महिनाभरापासून कुरबुरी सुरू होत्या. त्यातूनच शिवीगाळ, मारहाणीचे प्रकारही घडले आहेत. यावर कळंब पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई न करता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून बोळवण केली. ही मारहाण कोणी केली, कोणावर संशय आहे, याची माहिती पोलिसांना मृताचा मुलगा सुदर्शन झोरी याने जबाबात दिली आहे. तरीही पोलिसांनी संबंधित संशयितांवर अजूनही कारवाई केलेली नाही अथवा खुनाचा गुन्हाही दाखल केलेला नाही.
अहवालानंतर कारवाई
याबाबतचा पोसट मार्टेम रिपोर्ट आला आहे. हृदयविकाराने निान झाल्याचे त्यात म्हटले आहे. अंगावर मारहाणीचे वळ आहेत. औरंगाबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल. कुणालाही पाठीशी घालणार नाही
तानाजी दरोडे- पोलिस निरीक्षक, कळंब