प्रतिनिधी /उस्मानाबाद-तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा जनसेवा केंद्र व तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील गावसूद येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात ७५० रुग्णांनी लाभ घेतला. 
शिबीराचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक अशोक मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विकास भोसले, माजी सरपंच श्रीकांत तेरकर, बालाजी तेरकर, गणेश एडके, सुनिल एडके, हिम्मतराव भोसले, दादासाहेब एडके, मोहन डोलारे, प्रशांत गायकवाड, रमेश कावळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरात ह्वदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग यांसह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करुन उपचार केले. तसेच मोफत औषधांचा पुरवठा केला. शिबिराचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ झाला. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांना गावातच उपचार मिळाले. शिबिरात मुंबईचे डॉक्टर्स डॉ. अजीत निळे, डॉ. संजय देवरुखकर, डॉ. आशिषकुमार जैन, डॉ. कोमल, डॉ. मिताली, डॉ. बाराते, डॉ. विलास बोचरेे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. कार्यक्रमासाठी तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, अमीन सय्यद, नामदेव शेळके, उत्तम शिंदे, रवि शिंदे, संदिप चव्हाण, विजय काळे, पवन वाघमारे यांनी पुढाकार घेतला. 

 
Top