लोहारा/प्रतिनिधी-तुळजापुर तालुक्यातील बोरगाव (तुप)येथील मातंग समाजातील सुरेश देडे यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ लोहारा लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने शहरातील आंबेडकर चौकात दि.20 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अन्याय झालेल्या देडे कुटुंबीयाना न्याय मिळावा व आरोपीवर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आंदोलन कर्त्यांनी पोलील उपनिरीक्षक वाठारे यांना दिले. या रास्ता रोको आंदोलनात उस्मानाबाद महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सारिका ताई कांबळे, लातुर महिला जिल्हा अध्यक्षा माया ताई लोंढे, लोहारा तालुका अध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे, युवा तालुका अध्यक्ष विकी मोरे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा विमल ताई शिंदे, लातुर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष काशिनाथ दादा सगट, निलंगा तालुका अध्यक्ष शिवाजी लोंढे, लोहारा सचिव लक्ष्मण सगट, कोषाध्यक्ष बालाजी कसबे, शिवाजी दुणगे, ज्ञानेश्वर जाधव, वाघ सरवदे, पंडित रोडगे, बाबासाहेब शिंदे, शेषेराव थोरात, संगीता मोरे, वैशालि कसबे, शरद दुणगे, दगडु कांबळे, कार्तिक शिंदे, बालाजी मिसाळ, उमेश वाघमारे, अॕड. भागवत सगट, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.