उस्मानाबाद/प्रतिनिधी- तालुक्यातील आळणी येथे मंत्री मा.ना.श्री तानाजीराव सावंत साहेब व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,
युवा सेना संपर्क प्रमुख नितिन लांडगे,भुम तालुकाप्रमुख सुरेश भाऊ कांबळे,विभागिय वनविभाग सामाजिक वनीकरण उस्मानाबाद विभागाचे ए व्ही बेडके,उप तालुकाप्रमुख धनंजय वीर,श्रीपाल वीर,सुनिल माळी,रवि कोरे आळणीकर,यांच्या उपस्थितीत आळणी पाटी येथे वृक्षारोपण करण्यात आले.यानंतर आळणी ग्रामस्थांच्या वतीने शालेय साहित्य वह्या व वृक्ष देऊन मंत्री मा.ना.श्री तानाजीराव सावंत साहेब व नुतन खासदार मा.श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा आळणी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विभागप्रमुख संतोष पवार,बालाजी तौर,प्रसाद वीर,रमाकांत लावंड,वैभव वीर,अक्षय तौर,हनुमंत माळी,अंकुश माळी,दत्ता किर्दत्त,धनंजय जग्गन्नाथ वीर,धनंजय कदम,कृष्णा कदम,अजय भारत वीर,निलेश देशमुख,ज्ञानेश्वर देशमुख,रणजित लावंड,विकास वीर,यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
