कळंब/प्रतिनिधी-समाजात विविध सामाजिक संस्था कार्य करत आहेत पण कळंब रोटरी क्लबचे कार्य हे अनुकरणीय व प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन भाजपा नेते तथा धनेश्वरी शिक्षणसमूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले ते कळंब येथील रोटरी क्लबच्या नुतन पदाधिकारी सत्कारप्रसंगी बोलत होते.
यावेळी डॉ.शिल्पाताई प्रतापसिंह पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. दिलीप पाटील,भाजपा चिटणीस मिनाज शेख,भाजपाचे कळंब- उस्मानाबाद विधानसभा विस्तारक मकरंद पाटील,विस्तारक शिवाजीराव गिड्डे,भाजपा सरचिटणीस संजय जाधवर,भाजपा अनु.जाती तालुकाध्यक्ष आबासाहेब रणदिवे, ओबीसी सेलचे परशुराम देशमाने, अरविंद कदम,निहाल पठाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की गेल्या पाच वर्षापासून कळंब रोटरी क्लबचे कार्य मी पाहत आहे.कळंब शहरात वृक्षारोपन करण्याची पहिली सुरुवात जरी इतरांनी केलेली असली तरी त्याला ट्री गार्ड देऊन जतन करण्याचे कार्य कळंब रोटरी क्लबने केले आहे.पुढील काळात देखील रोटरी क्लब जे काम करणार आहे त्यासाठी मला जी कामाची जबाबदारी द्याल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळी रोटरीक्लबचे नुतन अध्यक्ष रो.हर्षद अंबुरे,नुतन सचिव रो.डॉ.हनुमंत चौधरी,इनरव्हील क्लबच्या नुतन अध्यक्षा राजश्री देशमुख तर सचिव म्हणून निता देवडा यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.तर रोटरी क्लब अॉफ कळंब सिटीच्या वतीने देण्यात येणारा कळंब भूषण पुरस्कारप्राप्त योगशिक्षक शशिकुमार भातलंवडे यांचा ही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.तसेच आय.एम.ए. प्रदेशाध्यक्ष पदी डॉ.रामकृष्ण लोंढे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांनी तर आभार शिवाजीराव गिड्डे यांनी मानले.