प्रतिनिधी/भूम-
दिव्यांगाना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी, परंडा भूम वाशी तालुक्यातुन,100 किमी अंतरावरून जाने कठीण होत असल्याने,12.30.वाजता जिल्हा रुग्णालय बंद होते, त्यामुळे दिव्यांगाना मोठ्या संघर्षेला सामोरे जावे लागते,व त्यामुळे दिव्यांगाची हेळसांड होत असल्याने मा.निवाशी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे साहेब उस्मानाबाद यांना तालुका स्तरावर, परंडा-भूम-वाशी.तालुक्यात,(अपंग) दिव्यांगचे महिन्याला तपासणी शिबिर घेण्यासाठी निवेदन देण्यात आले. आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या सुचनेवरून,निवाशी उपजिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गलांडे साहेब, समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, निवाशी उपजिल्हाधिकारी यांनी येत्या 2 दिवसात निर्णय घेऊन दिव्यांगाची तपासणी तारीख कळविण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, सचिव रियाज पठाण, परंडा तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय खैरे, माणकेश्वर सर्कल प्रमुख याशिन बादेला, तालुका महिला अध्यक्ष मंगल शिंदे, शहर अध्यक्ष उस्मानाबाद रसुल सय्यद,जावेद पठाण, आबु बादेला हे उपस्थित होते.
 
Top