प्रतिनिधी/उस्मानाबाद -
देशाला स्वातंत्र मिळून ७२ वर्ष झाली. पण गोंधळी समाजाचा कांहीच विकास झाला नाही. पवित्र पोर्टल या द्वारे शिक्षकांचे फार्म भरून घेण्यात आले. परिक्षा घेण्यात आली. ही परिक्षा पास झालेल्या युवकांना तुमची वयोमर्यादा संपली आहे, असे सांगण्यात आले. मराठा समाजाला ज्या प्रमाणे वयोमर्यादा सरकार वाढवून देणार आहे. त्याप्रमाणेच गोंधळी समाजाला वयोमर्यादा वाढवून देऊन आरक्षणाची टक्केवारी वाढवावी, अशी मागणी गोंधळी समाजाचे राष्ट्रीय युवा नेते संजय मारूती कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.
शुक्रवार दि. १९ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये संजय कदम यांनी बारामती जवळील पंधरे गांवामधील आरमाई मातेच्या मंदिराची १०० एकर जमीन पवार परिवाराने लाटल्याचा आरोप केला. या संदर्भात आपण पवार परिवारासोबत दोनदा बैठक केली. परंतु न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. आरमाई मातेचे मंदिर आहे, गोंधळी समाजाचे कुलदैवत असून जमीन हडप केल्यामुळे समाज तीव्र नाराज असल्याचे सांगितले. समाज न शिकल्यामुळे जात प्रमाणपत्राची १९६१ ची अट रद्द करून २००५ करावी, राष्ट्रीय स्तरावर डीएनटी कॅटेगिरीची निर्मिती करून ईदाते कमिशन लागू करावे, समाजाला राजकीय, शैक्षणीक, आर्थिक आरक्षण द्यावे आदी मागण्या असल्याचे सांगितले. संजय कदम यांनी समाजाच्या प्रश्रासाठी बारामती ते मुंबई पदयात्रा काढणार असल्याचे सांगितले. सरकार ने गोंधळी समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष सतिश लोंढे, अमोल लोंढे, अक्षय साळुंके, सतिश लोंढे, विजय मंजुळे, नारायण साळुंके, सचिन लोंढे, किरण मोरे आदी उपस्थित होते.
पुतळयासाठी घरे उठवली
गुजरात मध्ये वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळयासाठी या परिसरातील ६७ बंजाराचे घरे उठविण्यात आली आहेत. आज हे परिवार रस्त्यावर आले आहेत. या परिवारांना घरे देण्याची मागणी संजय कदम यांनी केली आहे. 
 
Top