तुळजापूर/प्रतिनिधी-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची जागा बदलण्यात आल्याबद्दल शहरातील युवकांनी संताप व्यक्त करत पुतळा मुळ जागी बसविण्याची मागणी केली. तसेच छत्रपतींचा पुतळा त्यांच्या किर्तीप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऐतिहासिक करण्याची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण सुरू असून असून अधिका-यांनी पुतळ्याची जागा बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत गुरुवारी (दि.25) दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी छत्रपतींचा पुतळा मूळ जागी बसवण्यात यावा, पुतळ्याचे सुशोभीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात यावे, सुशोभीकरण ऐतिहासिक दर्जाचे करावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी महंत माऊजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत अरण्य व्यंकट महाराज, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, जीवनराजे इंगळे, किशोर पवार, अर्जुन साळुंके, विपिन शिंदे, आण्णासाहेब क्षिरसागर, मयूर कदम, सुदर्शन वाघमारे, दिनेश कापसे, कुमार टोले, संदिप कदम, धैर्यशील कापसे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी मूळ जागेवरच करावी, या मागणीचे निवेदन एसडीएम गिरासे यांना देण्यात आले.