| लोहारा /प्रतिनिधी- महात्मा कबीर समता परिषदेतर्फे लोहारा येथील डॉ. हेमंत श्रीगिरे यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार लातूर येथे रविवारी (दि. २८) कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. हेमंत श्रीगिरे हे मागील २२ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. या कार्यक्रमासाठी मिठाराम राठोड, लातूरचे महापौर सुरेश पवार, समता परिषदेचे मुकुंदराज पाटील, रामकृष्ण बैले, संतोष सोमंवशी, नारायण चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. श्रीगिरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल लोहारा येथे माजी सरपंच शंकर जट्टे, माजी उपसरपंच व्यंकटराव घोडके, नवाज सय्यद, उत्तम पाटील, शहाजी जाधव, दत्ता गोरे, वैजिनाथ जट्टे, बाबुराव पवार, आप्पा देवकर, रघुनाथ घोडके, रामराव कुलकर्णी आदींनी डॉ. हेमंत श्रीगिरे यांचा सपत्निक सत्कार करून अभिनंदन केले. |
