प्रतिनिधी / परंडा-येथील जैन श्वेतांबर सभागृहात भारतीय जैन संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. तसेच विधुर, विधवा वधु-वर सुचक मेळावा, अल्पसंख्याकांचे शैक्षणिक फायदे, आरोग्य शिबिर आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय जैन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या हस्ते बैठकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. शांतिलाल कोचेटा, जिल्हाध्यक्ष अतुल अजमेरा, सचिव सचिन गांधी, सचिन रामढवे, तालुकाध्यक्ष राजकुमार जैन आदी उपस्थित होते. यावे संघटनेच्या परंडा शहर अध्यक्षपदी संदीप शहा तर उपाध्यक्षपदी जवाहरलाल परांडकर यांची निवड करण्यात आली. तसेच महिला शहर अध्यक्षपदी जोत्सना बेदमुथा तर उपाध्यक्षपदी पायल शहा यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे सदस्य म्हणून किरण शहा, रमणलाल बेदमुथा, सुयोग शहा, राहुल बेदमुथा, पंकज बेदमुथा, अभय देसाई, धन्यकुमार मोदी, प्रभात शहा, महेश मेहता, डॉ. जितेंद्र जैन, राहुल शहा, मोहनलाल देसाई, दिपाली शहा, सोनल शहा, सपना परांडकर, ज्योती मेहता यांची निवड झाली. |