| उस्मानाबाद /प्रतिनिधी- महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने सुमारे ५ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाशी तालुक्यातील कन्हेरी येथे घडली असून, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी (दि.२९) गुन्हा दाखल केला आहे. गौतम नामदेव खुटे (रा.कन्हेरी, ता.वाशी)असे आरोपीचे नाव आहे. त्याने गावातील एका महिलेस लग्नाचे आमीष दाखवून तब्बल २०१४ सालापासून दि.२९ जुलै २०१९ या कालावधीत वेळोवेळी तिच्या घरात घुसुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |