प्रतिनिधी /उस्मानाबाद-
शहरातील रविवारच्या आठवडी बाजार येथे सकाळी १० वाजता भारतीय जनता पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली. 
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसले, जिल्हा चिटणीस इंद्रजित देवकते, जिल्हा मीडिया सयोजक धनंजय रणदिवे, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय सोनटक्के, शहर सदस्य नोंदणी प्रमुख प्रतिक देवळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत डोके, नगरसेवक योगेश जाधव, दुर्गाप्पा पवार, अतिक पटेल, कोषाध्यक्ष गिरीश पानसरे, अजय सपकाल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.

 
Top