परंडा /प्रतिनिधी : -परंडा तालुक्यातील मौजे आनाळा येथे  सकाळी ठिक 11 वाजता परंडा भूम वाशी या तीन तालुक्यातून गावनिहाय एक प्रतिनिधी बोलवण्यात आले होते . या बैठकीत प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले या पचवार्षिक मध्ये चर्मकार समाजावर वाढलेल्याा अत्याचार,संत रोहिदास चर्मकार  महामंडळाच्या जाचक अटी शिथील कराव्यात,राष्ट्रीयकृत बॅके कडून महामंडाळाचे चर्मकार समाजासाठी मिळणाऱ्या कर्जासाठी होणारी पिळवणूक त्वरीत थांबवावे.महामंडाळाचे कर्ज प्रकरण त्वरीत निकाली काढावे ,महामंडळ ची सरसकट कर्ज माफी करावी.व्याज परतावा ट्रॅक्टर योजना चर्मकार महामंडळाला लागू करावी . या विविध मागंण्याचे निवेदन पालक मंत्री महोदयला भेट देऊन  देण्याचे ठरवले आहे.यावेळी मेजर आगंद सातपुते आनाळा, आण्णा सातपुते इनगोदा , उमेश सोनवणे परडा ,काशीनाथ कांबळे घारगाव ,सुनिल ढवारे, सोमनाथ गायकवाड अंजनसोंडा , लोखंडे सर समकुंडी , बाळासाहेब खर्डे सर ,थाटे सर भूम ,वसंत कांबळे वालवड ,कांबळे सर आनाळा, गोकुळ सोनवणे  शेकापूर, दादा साहेब भालेराव ईट,रूषीराज बनसोडे, गिरवली रावसाहेब कांबळे कुकडगाव, गोकुळ खर्डे वाटेफळ ,मारूती सातपुते आनाळ्, रोहिदास कानाडे आंतर गाव ,हानुमंत तांबे आष्टा, संकेत कांबळे शिराळा,  वसंत कदम वाशी , लक्षण कांबळे वाल वड, तुकाराम घोडके देऊळगाव आदी चर्मकार समाज मोठया संख्येने उपस्थित होता .
 
Top