प्रतिनिधी/उस्मानाबाद-शेतकऱ्याची जमीन भूसंपादनामध्ये येत नसल्याबाबत दाखला देण्यासाठी १२०० रुपयांची लाच घेणारा सीना कोळेगाव प्रकल्प उपविभाग ३ परंडा येथील अनुरेखक भारत दगडू माळी याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून गजाआड केले. ही कारवाई सोमवारी (दि.२२) परंडा येथे करण्यात आली. 
तक्रारदाराची सीना कोळेगाव प्रकल्पाजवळ शेतजमीन आहे. त्यांच्या जमिनीचे प्रकल्पासाठी भुसंपादन झालेले नाही. परंतु, सीना कोळेगाव प्रकल्पाजवळ ही जमिनी असल्याने त्यांना क्षेत्र भूसंपादनामध्ये नसलेबाबत दाखला हवा होता. याची त्यांनी सिना कोळेगाव प्रकल्प उपविभाग ३ परंडा या कार्यालयाकडे मागणी केली असता अनुरेखक भारत माळी यानी याकरीता १२०० रुपयांची लाच मागितली. याबाबत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचून सोमवारी माळी याना लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले. 

 
Top