उस्मानाबाद/प्रतिनिधी:- शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, उस्मानाबाद यांच्यामार्फत  आठशे झाडांचे वृक्षारोपण कुष्ठधाम   येथे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, प्रकल्प अधिकारी सोलापूर जागृती कुमरे,  सहायक प्रकल्प अधिकारी पल्लवी शेळके, श्री. अनपट, श्रीमती गायकवाड, श्री.एम.डी.शिंदे,  वसतिगृह मुख्याध्यापक,वरुडा श्री. चौगुले यांच्या हस्ते आठशे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
 हे वृक्षारोपण करण्यासाठी आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील जवळपास 150 विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी गृहपाल श्रीमती सारिका वेल्पुला, गृहपाल श्री. लोणे यांनी विशेष नियोजन केले होते.

 
Top