उस्मानाबाद/प्रतिनिधी-संगनमत करून केलेल्या मारहाणीनंतर तरुणाने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे रविवार ते सोमवारच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी सहा जणांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
रविवारी तसेच सोमवारी वाघोली येथे रोहित राजेंद्र मगर, वैभव अनिल गायकवाड, किरण शेषेराव मगर, योगेश सुरेश मगर, अमोल कालिदास मगर, सचिन अंकुश मगर (सर्व रा. वाघोली, ता. उस्मानाबाद) गावातील हरीओम चतुर्भुज मगर (वय २१) याला बेदम मारहाण, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या या मारहाणीला कंटाळुन हरीओम चतुर्भुज मगर याने शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेवुन आत्महत्या केली. हरीओमचे वडील चतुर्भुज शिवराम मगर यांच्या फिर्यादीवरुन उपरोक्त ६ जणांविरुध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात ३०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
Top