काटी/ प्रतिनिधी - तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील पोलिस ठाण्याला पोलिस अधिक्षक राजा यानी दि.२३ रोजी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक राजा यानी तामलवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.तत्पूर्वी रूजु झाल्यानंतर तामलवाडीस पहीलीच भेट असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ज्ञानेश्वर माळी,उपसरपंच दत्तात्रय वडणे,यशवंत लोंढे यानी पोलिस अधिक्षक यांचा फेटा,शाल व पुष्पहार घालुन सन्मान करून स्वागत केले.यावेळी त्यानी ग्रामस्थांना काही अडचणी असतील तर निःसंकोचपणे विचारा पोलिस जनतेच्या सेवेकरीताच आहेत आपलेही पोलिसाना सहकार्य असावे असे सांगितले.तामलवाडी पोलीस ठाण्यांतर्गत २७ गावे येत असुन पोलिसाना सर्वांचे सहकार्य होते असे रामा मस्के यानी सांगितले. गावामध्ये सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहातात व सर्वजण कायदा, सुव्यस्थेचे पालन करत असल्याचे सांगुन सर्जेराव गायकवाड यांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मंजुषा सानप,उपनिरीक्षक अफरोज पठाण,यांच्यासह सर्व पोलिस तसेच ग्रामसेवक लाटकर,बसवणप्पा मसुते,अब्बास पटेल,विठ्ठल माळी,रामा मस्के,निरंजन करंडे,सुधीर पाटील,सचिन शिंदे,नागेश शिंदे, तुकाराम सुरवसे,तसेच परीसरातील पोलिस पाटील,महीला पोलिस पाटील, तसेच तामलवाडीसह परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.