संवाददाता । तामलवाडी -
पुणे येथील शालिनी फाऊंडेशनच्या वतीने संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख गायक व संगीतकारासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय "महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार" 2019 हा तूळजापूर तालुक्यातील आरळी बु येथील शेतकरी कुटुंबातील अमोल अनिल पारवे यांना पुण्याच्या एसीपी नीलम जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी शालिनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गोरे,उपाध्यक्ष आकाश वढवराव,कार्याध्यक्ष सत्यमसिंह राजपूत,पालक अनिल पारवे,सुनंदा पारवे,प्रिया शहा,आशिष पारवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरळी बु येथील प्राथमिक शाळेत, अमोल पारवे यांनी शिक्षण घेतले,त्यानंतर अणदूर,पुणे येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयात आपले उच्च पूर्ण करत एम कॉम पर्यंत शिक्षण घेतले,अमोल पारवे यांनी  आवड म्हणून संगीत क्षेत्राकडे वळला अन त्यातच करिअर करण्याचे ठरवले,पुण्यातील नामवंत संगीत गुरू पंडित पुष्कर लेले यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत तर जगप्रसिद्ध गायक पंडित सुरेशजी वाडकर यांच्याकडे उपशास्त्रीय संगीत शिक्षण पूर्ण केले.
अमोल पारवे यांनी शास्त्रीय संगीत शिक्षण पूर्ण करीत असतानाच आपले सहकारी मित्र साईप्रसाद,अजय व सन्मित यांना सोबत घेत रूहनियत नावाचा बँड तयार करून तो आज भारतात सर्वच मोठं मोठ्या शहरात गायनाचे कार्यक्रम करीत असतो, आज पर्यंत पुणे,मुंबई, गोवा,हैद्राबाद, कलकत्ता, दिल्ली, सोलापूर, यासारख्या शहरात जवळपास 300 पेक्षा जास्त संगीत कार्यक्रम केले आहेत,या रुहनियत बँडच्या माध्यमातून सुफी गजल,शास्त्रीय गायक,बॉलिवूड गीते, रेस्ट्रो,ओल्डस्कुल,आदी प्रकारात गाणे गात असतो.
अमोल यांना "महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार" मिळाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आर्ट डिझायनर खाजाभाई सय्यद,राज्यस्तरीय तालसाधना पुरस्कार विजेता गणेश तानवडे,प्रसिद्ध मुर्तीकार उमेश व्हरकट,आरळी महोत्सव समिती अध्यक्ष,सुनील पारवे,फौजदार संजय पारवे,तंटामुक्त समिती अध्यक्ष किरण व्हरकट,माजी जि.प.सदस्य काशिनाथ बंडगर,माजी सभापती मुकुंद डोंगरे,रामेश्वर तोडकरी,काटीचे सरपंच आदेश कोळी,मकरंद देशमुख,सरपंच सौ.ज्योतीताई पारवे,छावा जिल्हाध्यक्ष महेश गवळी,पापालाल सय्यद,सुधाकर उकरंडे,विरनाथ बचाटे, भिमराव पारवे,धर्यशील नारायणकर,गोविंद पारवे,प्रवीण व्हरकट,मल्लिनाथ वैद्य,संभाजी उळेकर,वस्ताद राम पारवे आदींनी कौतुक करून अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या  आहेत.
 
Top