काटी / प्रतिनिधी - तुळजापूर  तालुक्यातील मसला ( खुर्द) येथील तरुण  शेतकरी  विशाल  विशाल  भागवत नरवडे वय ( 27 )  याचा रविवार  दि. (21)  रोजी  सकाळी  विद्युत  पोलच्या सपोर्टसाठी दिलेल्या  तारेला धक्का लागल्याने  विद्युत  शाॅक लागून दुर्दैवी  मृत्यू झाला. 
 याबाबत  सविस्तर  वृत्त  असे की, मसला (खुर्द) येथील तरुण व मनमिळाऊ  तथा सर्व  कुटुंबाचा आधारवड  विशाल भागवत नरवडे वय (27)  हा एक  उमदा तरुण शेतकरी रविवार  दि. ( 21 )  रोजी सकाळी 7 वाजनेच्या दरम्यान  शेतातील  कांद्याच्या रोपाला पाणी  देण्यासाठी  गेले असता विद्युत  मोटार  चालू करण्यापुर्वी विहिरीत  पाणी किती आहे  हे पहाण्यासाठी विहिरीत डोकावून  पहात असताना विहिरी जवळच असलेल्या विद्युत  पोलला सपोर्टसाठी लावलेला  तारेला हात लागल्याने व त्यात विद्युत  प्रवाह उतरल्याने  शाॅक लागून जागीच मृत्यू झाला.  ही खूप दुःखद घटना रविवारी  मसला (खुर्द ) या गावी घडली. मयत विशाल  याचे लग्न  तीन वर्षांपुर्वीच झाले होते. लग्नानंतर  आयुष्यातील अनेक स्वप्नांचे चित्र रेखाटणार हा तरुण चित्रात रंग न भरताच अर्ध्यातून निघून गेला .त्याच्या कुटुंबियांवर खूप मोठे दुःख कोसळले. ही दु:खद घटना  गावात पसरताच  गावावर अक्षरशः  दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  गावातील  प्रत्येकजण हळहळ व्यक्त  करीत आहे. मयत विशाल  याच्या पश्चात  आजोबा, आईवडील,  पत्नी,  एक  वर्षाचामुलगा,  एक भाऊ,  एक  बहीण  असा परिवार आहे.
 
Top