प्रतिनिधी/उस्मानाबाद-
गरोदर माता मृत्यू दर कमी व्हावा, गरोदर मातांना योग्य उपचार मिळावेत यासाठी गरोदर मातांची जवळच्या कोणत्याही शासकीय रूग्णालयात नोंद होणे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतू उस्मानाबाद येथील शासकीय महिला रूग्णालय मात्र गरोदर मातांची नोंदणी करताना, आपण कोणत्या भागात राहता तो भाग आमच्याकडे नाही, तो शाहूनगरच्या नागरी आरोग्य केंद्राकडे आहे, असे सांगितले जाते. तर शाहू नगरचे नागरी आरोग्य केंद्र लोकसंख्येनुनसार हा भाग वैराग रोड येथील नागरी आरोग्य केंद्राकडे येतो त्यामुळे तेथे नोंद करा, अशा प्रकारचा सल्ला देऊन गरोदर मातांची नोंदणी करण्यास टाळाटाळ करण्याचे उदाहरण समोर आले आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी सरकार ने विविध योजना आखल्या असून केवळ योजनेची अंमलबजावणी करण्याअभावी नाहक लोकांना त्रास होत आहे. निती आयोगाच्या निकषानुसार, देशात उस्मानाबाद जिल्हा मागासवर्गात तीन नंबर आहे. निती आयोगाच्या अहवालात आरोग्य निकष महत्वपुर्ण मानला जातो. निती आयोगाच्या पहाणीत जिल्हयातील व्यक्तीचा आर्युमान या निकषानुसार सव्र्हे करून अहवाल दिला जातो. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून गरोदर माता मृत्यू, अर्भक मृत्यू, बालक मृत्यू याला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना तयार केल्या आहेत. परंतू या उपाययोजनेची अंमलबजावणी मात्र, एक दुस-याकड बोट दाखवून टाळाटाळ केली जाते.
राज्याच्या मानाने गरोदर माताच्या प्रसूतीमध्ये मृत्यूचे प्रमाण, कमी असून, अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण ही कमी आहे. २००५-२००६ मधील गरोदर माता मृत्यूचा दर १ लाख गरोदर माताच्या मागे १०२ होता. तर राज्यात हाच दर ३०७ होता. परंतू गेल्या कांही वर्षांपासून राज्य सरकार ने राज्यातील गरोदर मातांचे मृत्यचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या त्यामुळे राज्यात १ लाख गरोदर मातांच्या मागे मृत्यू प्रमाण ६७ आहे. तर उस्मानाबाद जिल्हयात हाच दर ४८ इतका आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिकारी आरोग्यदायी योजना चागल्या प्रकारे राबवित असले तरी आरोग्य विभागातील कांही कर्म-यांच्या हलगर्जीपणामुळे हे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोठे ही नोंद करा
गरोदर मातेची व्यवस्थीत काळाजी घेण्यासाठी व आरोग्य चांगले राहण्यासाठी गरोदर मातांनी जवळच्या कोणत्याही शासकीय रूग्णालय अथवा आरोग्य केंद्रात आपली नोंदणी करने गरजेचे आहे. त्यानुसार त्यांच्यावर लसीकरण व अन्य उपचार केले जातील. त्यामुळे लोकसंख्येनुसार गरोदर मातांची नोंदणी अमुक रूग्णालयातच केली पाहिजे, असे कांही नाही, या प्रकरणात लवकरच संबंधीत रूग्णालयांना आदेश देऊत, असे लोकराज्यशी बोलताना सांगितले.
हणुमंत वडगावे-जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद