उमरगा/प्रतिनिधी-सामाजिक कामासाठी भरपूर क्षेत्र असले तरी हे करत असताना इतरांच्या सहकार्याने कार्य केले तर आपल्या सोबतच सहकार्याची प्रगती होते. डॉक्टरानी आरोग्य सेवा ही सामाजिक कार्य समजून सर्व सामन्यांना पर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे निर्वाचित अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी केले.
शहरातील जिजामाता हॉस्पीटल येथे डॉ. इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वुमन डॉक्टर विंग शाखेच्या बुधवार दि. 24 रोजी उदघाटन सोहळयात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एआयएम अध्यक्षा डॉ. दिपा मोरे होत्या. यावेळी डॉ. ज्योती चिडगुपकर, आयएमए महाराष्ट्र राज्याचे सहसचिव डॉ. संतोष कुलकर्णी, आयएमएचे संस्थापक सचिव डॉ. दामोदर पतंगे, आयएमए उमरगा शाखेचे सचिव डॉ. प्रशांत मोरे, महिला विंगच्या नुतन अध्यक्षा डॉ. सुचेता पोफळे आदीची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी महिला डॉक्टर्स विंगची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शुभांगीनी महाजन यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. मनिषा शिंदे व डॉ. मैत्री तावशीकर यांनी तर डॉ. शशी कानडे यांनी आभार मानले. यावेळी माजी अध्यक्ष डॉ. दत्तात्रय थिटे, डॉ. दिपक पोफळे, डॉ. सुभाष वाघमोडे, डॉ. नितीन लोहरेकर, डॉ. उदय मोरे, डॉ. वसंत बाबरे, डॉ. कपिल महाजन, डॉ. लक्ष्मीकांत डिग्गीकर, डॉ. अनिकेत इनामदार, डॉ. पंडित बुटुकने, डॉ. अजित शिंदे, डॉ. अनंत मुगळे, डॉ. एन. डी. बिराजदार, डॉ. अनुराधा लोहरेकर, डॉ. कादंबरी उपासे, डॉ. अंबिका पतंगे, डॉ. साधना इनामदार, डॉ. अनिता बिराजदार, डॉ. सुवर्णा मुगळे, डॉ. कोमल जाधव आदीसह डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.