तुळजापूर/प्रतिनिधी- येथील क्रांती चौकातील तुंबलेल्या ड्रेनेज लाईन मध्ये ऐक व्यक्ती  पडला असता प्रसंगवधान राखुन  तेथे असणाऱ्या  मंडळीनी त्यास वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला .या बाबातीत अधिक माहीती अशी कि येथील क्रांती चौकात ड्रेनेज लाईन असुन ही सातत्याने तुंबलेली असती यात रविवार दि21रोजी दुपारी तहसिल कार्यालयकडे  जात आसलेला ऐक व्यक्ती या ड्रेनेज लाईन मध्ये पडला असाता  जवळील मंडळी नी वेळीच प्रसंगावधान राखुन त्यास आतुन बाहेर काढल्याने  होणारी  संभाव्य जीवीत हानी  टळला.
तिर्थक्षेञ येथे कोट्यावधी रुपये खर्चुन तुळजापूर विकास  प्राधिकरणांतर्गत  केलेले ड्रेनेज कामाचे पितळ दिवसेंदिवस उघडे पडत असल्याने या कामाची तपासणी होणे गरजेचे बनले आहे 
 
Top