प्रतिनिधी/उस्मानाबाद-
जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीमुळे व बदललेल्या हवामानाने शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक तापाचे रूग्ण दिसून येत असून जिल्हयात वैद्यकीय अधिका-यांच्या ३७ जागा रिक्त असल्यामुळे रूग्ण खाजगी रूग्णालयाकडे वळत आहेत. जिल्हयात दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भाग आर्थिक समस्याच्या घे-यात आडकलेला असतानाच वैद्यकीय सुविधा अभावी रूग्णांना खाजगी रूग्णालयातील आर्थिक भुर्दंडाचा सामना करण्याची वेळ आली आहे.
निती आयोगाच्या निकषानुसार जिल्हयातील मानवी निर्देशाकनुसार व्यक्तीचे आर्युमान हा महत्वाचा निकष मानला गेला आहे. परंतू जिल्हयातील वैद्यकीय अधिका-यांच्या जागा रिक्त असल्यामुळेच निती आयोगाच्या अहवालात उस्मानाबाद जिला मागासवर्गीयामध्ये तिसरे क्रमांकावर फेकला गेला आहे. उस्मानाबाद जिल्हयात एकुण ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यामध्ये नियमीत ४८ वैद्यकीय अधिकारी आहेत. तर इतर मिळुन एकुण ५० वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास २ वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. परंतू जिल्हयातील कांही प्राथमिक आरोग्य केंद्रास एकाच वैद्यकीय अधिका-यावर अवलंबून रहावे लागते. तर कांही वैद्यकीय अधिका-यांकडे दो-दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पदभार सोपविले आहेत.
विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्हयाच्या शेजारील लातूर व सोलापूर जिल्हयात वैद्यकीय अधिका-यांची कमतरता नाही. परंतू उस्मानाबाद जिल्हयात मात्र गेल्या कांही वर्षांपासून वैद्यकीय अधिका-यांची कमतरता नेहमीच जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात लक्ष घालून त्वरीत रिक्त जागा भराव्यात अशी मागणी केली जात आहे.
३१ जुलाई ला होणार तपासणी
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने ३१ जुलाईला तंज्ञ डॉक्टराकडून गरोदर महिला व इतरांची तपासणी होणार आहे. जिल्हयात दुष्काळामुळे सामाजिक, मानसिक व आर्थिक तनावामुळे ग्रामीण भागात नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हयात कुपोषीत बालकांचा जन्म होणे, मुलाची वाढ व उंची खुंटणे, जन्मता व्यंग येणे आदी विविध कारणामुळे गरोदर मातांची काळाजी घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने तंज्ञ डॉक्टरांकडून ३१ जुलाई ला गरोदर मातांची तपासणी शिवीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली.
वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे जागा रिक्त
सोलापूर व लातूर जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे तेथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिका-यांची जागा रिक्त राहू शकत नाही, प्रशिक्षण कालावधीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांना संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य ठिकाणी पाठविले जाते. परंतू उस्मानाबाद जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे वैद्यकीय अधिका-यांच्या जागा रिक्त या आहेत. या रिक्त जाता भरण्यासंदर्भात बीएएमएस ला ही संधी देणाार असल्याचे सांगितले.
हनुमंत वडगावे-जिला आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद