उस्मानाबाद/प्रतिनिधी-
गेल्या कांही वर्षांपासून उस्मानाबादसह मराठवाडयात जास्त पाऊस नाही त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. हे नष्ट करण्यासाठी वृक्ष लागवड  मोठया प्रमाणात होणे आवश्यक आहे. वृक्षतोड करून पुढील पिढयांसाठी वाळवंट तयार करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा-मुधोल मुंडे यांनी केले आहे.
रूपामाता परिवार व जलसंपदा विभाग उस्मानाबाद यांच्या वतीने वृक्ष लागवड शुभारंभ पाडोळी येथील रूपामाता डेअरी, रूपामाता नॅचरल शुगर व वेअर हाऊस येथे करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी दिपा  मुधोल-मुंडे बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास रूपामाता परिवाराचे अध्यक्ष अॅड.व्यंकटराव गुंड, शिक्षणाधिकारी सविता भोसले, सरपंच संगिता कांबळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी, बाबुराव पुजारी, संस्थेचे उपाध्यक्ष मारूती सुर्यवंशी, अशोक पाटील, संचालक राजा वैद्य, जलसंपदा विभागाचे अरविंद पाटील, भोज, एम.डी.सुर्यकांत गरड आदी उपस्थित. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी मुधोल मुंडे यांनी प्रत्येकांने मानुसकीच्या भावनेतून गाव, जिल्हा, राज्य व देशासाठी सामाजिक भावनेतुन काम करावे, रूपामाता परिवाराने वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतल्यामुळे या भागात सकारात्मक दृष्टीकोन तयार होईल, रूपामाता समुहाने या भागात उद्योग उभारून लोकांच्या महत्वकांक्षाला वाव दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रूपामाता नॅचरल शुगरच्या १ किलो गुळ पावडर पॅंकींगचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. रूपामाता परिवाराचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांनी गेल्या कांही वर्षांपासुन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली की, हाताला काम नसल्याने लोक गाव सोडून जात होते. त्यामुळे या परिसरात उद्योग उभारण्याचा विचार केला, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय गुुंड यांनी केले. कार्यक्रमास जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, शिवाजी गिड्डे , अॅड. शरद गुड आदी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांचे स्वागत सरपंच संगिता कांबळे यांनी केले.

 
Top