उमरगा / प्रतिनिधी-
तंबाखू सेवन करणार्‍या व्यक्तीची सवय लवकर सुटत नसली तरी त्यानी मनावर ताबा ठेवून हळूहळू कमी करावी लोकांची मानसिकता वाईट सवयीपासून परावृत्त न होण्याकडे अधिक असते. तंबाखू सेवनाची सवय असलेल्या लोकांनी माणसिकता बदलून कर्करोग व त्याच्याशी साधर्म्य असलेल्या आजारांनी पीडित होण्या पेक्षा निरोगी जीवन जगायचे असेल तर तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन बंद करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डाॅ पंडित पुरी यांनी केले.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त शुक्रवार दि 31रोजी तंबाखू विरोधी शपथव मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ. पुरी अध्यक्षस्थाना वरून बोलत होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. विनोद जाधव, डाॅ रमेश थोरात, डॉ. कोमल गरड, डाॅ. मुजीब मोमीन, एनसीडीच्या समुपदेशक पुजा बायस आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डाॅ पुरी म्हणाले की, देशातील तरूणां सह किशोर वयीन मुलांत दिवसेंदिवस तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु तंबाखू मुळे शरिरावर होणार्या जीवघेण्या दुष्परिणामा कडे दुर्लक्ष केले जात आहे. त्मुयाळे अनेकांना तोंडाचा कर्करोग, श्ववसनाचा त्रास, उच्च रक्तदाब, तोंड येेेणे, तोंडात पांढरे चट्टे, हृदयविकार, अर्धागवायू, लैंगिक समस्या, पुरषामध्ये नपुसकता वाढ होत असल्याचे सांगून जेव्हा कर्करोग झाल्याचे निदान होते तेव्हा त्यावरील इलाजावर लाखो रूपये खर्च होतात. आर्थिक नुकसान व विवंचना निर्माण होते. त्यामुळे कौटुंबिक व मानसिक नैराश्य येते यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या मनाच्या तयारीसह तंबाखू व्यसना पासून दूर ठेवून निरोगी आरोग्य व चांगले जीवन जगावे असे शेवटी आवाहन केले. यावेळी उपस्थिताना तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुुुत्रसंचालन एनसीडीच्या समुपदेशक पुजा बायस यांनी केले. अधिपरिचारिका अश्विनी केंद्रे यांनी आभार मानले.  यावेळी औषध निर्माता विजय ईरलीकर, विष्णू मुळे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी गुणवंत गायकवाड, समुपदेशक अभय भालेराव, अधिपरिचारीका कल्पना चव्हाण, वरिष्ठ लिपिक हाणमंत कुंभार, कनिष्ठ लिपीक उत्तमबाई शिदोरे आदीसह रूूग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top