प्रतिनिधी/ उस्मानाबाद-
महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा राम दत्तगिरी (२९) रा. निर्मला अर्पाटमेंट श्रीकृष्णनगर उस्मानाबाद यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्यांचा प्रयत्न केल्या प्रकरणी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पुलिस महानिरीक्षक डा.रविंद्रकुमार सिंगल आज दिवसभर पोलिस अधिक्षक यांच्या कॅबिन मध्ये बसून चौकशी केली. चौकशी पुर्वी सिंगल व पोलिस अधिक्षक आर.राजा यांनी निर्मला अर्पाटमेंट या घटनास्थळास भेट दिली.
३१ मे २०१९ च्या सकाळी पोलिस उपनिरीक्षक गिरी यांनी अर्पाटमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी गिरी यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन चार ते पाच ठिकाणी फॉक्चर होऊन गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले. सदर प्रकरण पोलिस दलाने गंभीरपणे घेतले असून विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्रकुमार सिंगल यांनी उस्मानाबाद पोलिस मुख्यालयात पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयात बसून या प्रकरणी अधिक चौकशी केली.

 
Top