प्रतिनिधी/उमरगा-
गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडी तर विधन विहीर शेवटच्या घटका मोजू लागल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्या साठी नागरिकांची भटकंती थांबविण्या साठी सरपंचानी स्वत च्या विधन विहीरी पासून स्वखर्चातून खोदलेल्या पाईपलाईन द्वारे आठवडा भरापासून गावक-यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे.
तालुक्यातील कोरेगाव वाडी हे 1 हजार 750 लोकसंख्या तसेच दोनशेच्या जवलपास कुटूंब संख्या असलेल्या गावाला पाणीपुरवठा करणा-या गावा पासून तीन किमीवर असलेल्या लघु पाटबंधारे तलावातील विहीर गेल्या महिन्यापासून कोरडी तसेच विहीरी जवळील विधन विहीर देखील शेवटची घटका मोजू लागल्याने तीन हातपंपा पैकी दोन हात पंपानी तीन महिन्यापूर्वी दम तोडला तर एका हात पंपाचे जेमतेम  पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले. जवलपास कोठेही अधिगृहना साठी पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्या मुळे पाण्यासाठी महिला व नागरिकांचे होणारे हाल बघून सरपंच नागनाथ कुंभार यांनी शासना कडे हात पसरत बसण्या पेक्षा स्वत:च्या शेती व वीट भट्टी लागणारे पाणी बंद करून स्वखर्चातून एक किमी वरून पाईप लाईन सह दोन भागात विभागलेेल्या गावातील एक ठिकाणी पाण्याच्या हौदात तर एका ठिकाणी आड व गावातंर्गत नळ योजेनेच्या पाईप लाईनची जोडणी करीत मुबलक पाणी पुरवठा सुरू केला आहे. यामुळे ग्रामस्थांना संभाव्य पाणी टंचाईच्या जोखडातून मुक्ती मिळाली आहे. दरम्यान पाण्या करीता हौदावर जमलेल्या महिलांच्या चेहऱ्या वरील स्मित हास्य व कृतार्थ भाव ओसंडुन वाहत होता. तर उपस्थित सारेजण सरपंच कुंभार यांचेवर स्तुती सुमने उधळून कृतज्ञता व्यक्त करीत होते.
 
Top