प्रतिनिधी/तुळजापूर-
येथील लातूर रस्त्यावरील असणा-या नव्या बसस्थानकातील प्रवाशी खुच्र्यांची तोडफोड झाल्याने त्या प्रवाशांना बसण्यालायक नसल्याने त्याची दुरुस्ती करुन त्या प्रवाशांना बसलायक करण्याची मागणी कर्तव्यदक्षप्रवाशांने एस टीच्या वर्धपान दिनी निवेदन देवून केली .
या घटनने ऐकात्तर वर्षानंतर ही प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्या बाबतीत परिवहन खात्या कडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तुळजापूर येथे लातूर रस्त्यावर भव्य दिव्य लाखो रुपये खर्चुन  अधावत असे बसस्थानक बांधले  आहे. येथे लांब पल्याचा व ग्रामीण भागातील एस टी बसेस थांबवल्या जातात. ऐकीकडे एस टी महामंडळ आपला 71वा  वर्धापन दिन  साजरा करीत असताना दुसरीकडे प्रवाशी माञ  बसस्थानक मधील  ब-याच  खुच्र्यांची मोडतोड  झाल्याने प्रवाशी बसस्थानक मध्ये तासोनातास उभे राहुन बसची वाट पहात असल्याचे दृश्य येथे एस टी च्या वर्धपान दिनी दिसत होते येथील खुच्र्यांची मोडतोड झाल्याने गरोदर महिला अपंग व्यक्ती वृध्द देवीच्या दर्शनार्थ येणारा भाविक यांना बस येई पर्यत तासोनतास उभे राहावे लागले हे ऐका कर्तव्ये दक्षयुवा प्रवासी यास पाहवले न गेल्याने त्या  सागर तुकाराम ठोंबरे या युवा प्रवाशाने तोडफोड  झालेल्या खुच्र्यांची  दुरुस्ती करुन त्या बसण्यालायक करुन प्रवाशांची बसण्याची होणारी गैरसोय दूर करण्याच्या मागणी चे निवेदन डेपो मँनेजर राजकुमार दिवटे यांना दिले त्यांनी या बाबतीत वरिष्ठ पातळीवर कळविण्याचे आश्वासन देवीन त्या लवकर दुरुस्ती केले जाईल असे आश्वासन  दिले.
 
Top