काटी / प्रतिनिधी -
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडीचे रहिवासी तथा भिवंडी कोर्टात कार्यरत असलेले अॅड. हणमंत माणिकराव जाधव यांची प्रदेश अध्यक्ष शिवश्री प्रविण घोगरे यांच्या मार्गदर्शनखाली व ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री मंगेश आवळे यांच्या सुचनेनुसार मराठा सेवा संघाच्या ठाणे जिल्हा प्रवक्तापदी निवड करण्यात आली. सामाजिक बांधिलकीची जाण, व समाजाच्या उत्कर्षासाठी व भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी व मराठा सेवा संघाचे कार्यासाठी आपल्या पदाच्या माध्यमातून कार्य करावे असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. या निवडीबद्दल ठाणे जिल्यासह तुळजापूर तालुक्यातील काटी परिसरातील अनेकांनी निवडीबद्दल अॅड. हणमंतराव जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
