प्रतिनिधी / उस्मानाबाद-अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) जिल्हाध्यक्षपदी अॅड. देविदास वडगावकर यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. महेश मोटे, तर प्रधान सचिवपदी चंद्रकांत उळेकर गुरुजी यांची फेरनिवड करण्यात आली. 
अंनिसच्या वतीने जिल्हा बुधवारी (दि.५) येथील छत्रपती हायस्कूलमध्ये प्रेरणा मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्य समितीचे निरीक्षक म्हणून राज्य सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग सहकार्यवाह हरिदास तम्मेवार (ता. अहमदपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी दोन वर्षांसाठी कार्यकारिणी निवड झाली. यामध्ये अॅड. देविदास वडगांवकर, प्रा. डॉ. महेश मोटे, उपाध्यक्षपदी सूर्यकांत साळूंके, प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर गुरुजी, बुवाबाजी संघर्ष सचिव प्रा. बालाजी राऊत, सहसचिव प्रा. प्रभाकर गायकवाड, विविध उपक्रम सचिव बालाजी तांबे, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प सचिव प्रा. दादाराव गुंडरे, वार्तापत्र व्यवस्थापन सचिव गोर्वधन गरड, प्रशिक्षण विभाग सचिव प्रा. दत्तात्रय जाधव, महिला सहभाग सचिव अॅड. जिनत प्रधान, सहसचिव अर्चना रणदिवे, युवा सहभाग सचिव प्रा. राजाराम निकम, सहसचिव प्रा. डॉ. बालाजी गुंड, जातीअंत संकल्प सचिव वामन पांडगळे, सहसचिव विजय गायकवाड, मानसमित्र आरोग्य प्रकल्प सचिव सुधीर कांबळे, सहसचिव बाळासाहेब जमाले, विज्ञानबोध वाहिनी सचिव-प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, सोशल मिडीया व्यवस्थापन सचिव अरविंद शिंदे, सांस्कृतिक अभिव्यक्ती सचिव प्राचार्य डॉ. अनिल जगताप, राष्ट्रीय समन्वय सचिव-प्रा. अवंती सगर, निधी व्यवस्थापन सचिव- देविदास पावशेरे, कायदेविषयक व्यवस्थापन सचिव- अॅड रवींद्र मैदाड आदिंची निवड करुन कामाची विभागणी करण्यात आली. मेळाव्याचे प्रास्ताविक चंद्रकांत उळेकर यांनी, सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय जाधव तर आभार अॅड. अजय वाघाळे यांनी मानले. 'हम होंगे कामयाब' या गीताने मेळाव्याचा समारोप करण्यात आला. 

 
Top