उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिक्षणमहर्षी प.पू.डाॅ.बापुजी साळुंखे यांंनी परिस्थितीवर मात करत दारिद्र्याचे चटके सहन करत शिक्षण पुर्ण केले व ते शिक्षक बनले ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रिद घेऊन बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरोणाउपाय नाही हे ओळखुन त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली व सबंध राज्यभर त्यांनी शैक्षणिक क्षेञात एक क्रांतीच केली.डाॅ.बापुजी साळुंखे यांचे कार्य म्हणजे एक सुंदर विचारच होता असे प्रतिपादन डाॅ.बापुजी साळुंखे यांची १०१वी जयंती ,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात साजरी करतांना आपल्या व्याख्यानात प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर यांनी केले आहे.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
शिक्षणमहर्षी डाॅ.बापुजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पुजन यावेळी डाॅ.इंदलकर व महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक यांनी केले.
यावेळी डाॅ.ए.बी.इंदलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर प्रा.डी.एम शिंदे स्टाफ सेक्रेटरी प्रा.पी.डी.क्षीरसागर उपस्थित होते.पुढे बोलतांना डाॅ.इंदलकर म्हणाले की,चांगला देश घडवायचा असेल जगात देशाचे नाव करायचे असेल तर समाजाला चांगले शिक्षण दिले पाहिजे हे शिक्षण देण्याचे महान कार्य शिक्षणमहर्षी डाॅ.बापुजी साळुंखे यांनी केले.या महामानवाच्या संस्थेत आपण शिक्षकांनीही शिक्षणाचे पाविञ्य राखण्यासाठी तेवढ्याच पाविञ्याने विद्यार्थ्यांना ज्ञान दिले पाहिजे.यावेळी प्रा.डी.एम.शिंदे ,प्रा.एस.पी.मोहिते,प्रा.राजा जगताप यांनीही आपल्या मनोगतातुन डाॅ.बापुजी साळींखे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक,कर्मचारी,सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूञसंचालन प्रा.राजा जगताप यांनी केले तर आभार प्रा.पी.डी.क्षीरसागर यांनी मानले.
