भूम/प्रतिनिधी-
आपण कोणत्याही जातीचे धर्माचे असोत शिवसेनेला मतदान करणारे असोत किंवा नसोत तुम्ही कोणालाही मतदान करणारे असो सध्या परिस्थिती बिकट असून आम्ही अश्या वेळी सदैव शेतकरी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत म्हणून कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता शिसैनिकला हाक मारा शिवसेना कुठल्याही प्रसंगी आपल्या मदतीला धावून येईल असे प्रतिपादन युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी भूम येथील शेतकऱ्यांच्या परिस्थिती व छावणी भेट महाप्रसाद कार्यक्रम निम्मित बोलत होते.
पुढे म्हणाले की स्व बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण म्हणून जो पर्यन्त चांगला पाऊस पडत नाही तो पर्यंत छावणी वरील शेतकरी यांना सायंकाळी चे जेवण शिवसेना देणार हा शिवसेनेचे उपकार नसून आपण दिलेला आशिर्वाद आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविण्यात येत असून कुठल्याही अडचणी असतील ते सढळ मनाने शिवसेनेला सांगा असे ही बोलले.
या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना,उपनेते तानाजी सावंत, खासदार ओमराजे निबांळकर सह संपर्क प्रमूख शंकर बोरकर, जिल्हा समन्वयक दत्ता साळूके, जिल्हा प्रमूख गौतम लटके, कैलास पाटील, युवसेना संपर्क प्रमूख नितिन लांडगे,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजीउपजिल्हाप्रमूख दिलिप शाळू, उपजिल्हा दत्ता मोहिते, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत,,युवा सेना आधिकारी आक्षय ढोबळे, चेतन बोराडे, जिल्हा संघटक मेघराज पाटील , भूम तालुकाप्रमूख सुरेश कांबळे,तालुकाप्रमूख शिवाजी कापसे, परांडा तालुकाप्रमूख आण्णा जाधव, माजी शहरप्रमूख दत्ता रणभोर ,वाशी तालुका सत्यवान गपाट, प.सं सदस्य बालाजी गुंजाळ,महिला आघाडी जिल्हा संघटक शामल वडणे पवार ,कल्याणी बोराडे, तालुका संघटक अर्चना दराडे युवा सेना आधिकारी निलेश चव्हाण, बाळासाहेब मांगले, राहूल डोके, प्रल्हाद आडागळे,सरपंच विशाल ढगे, वालवड उपसरपंच औदुंबर मोहिते, शहरप्रमूख गणेश शेंडगे, युवराज कोकाटे आदींची उपस्थिती होती.

 
Top