काटी/ प्रतिनिध- तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. (11) रोजी सकाळी दहा वाजता येथील निलकंठेश्वर मंदिराच्या सभागृहात स्वर्गीय साने गुरूजी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सलग चौथ्या वर्षी गुरुजी विचार मंचच्या वतीने आयोजित दहावी, बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा सत्कार सोहळा व काटी भूषण पुरस्कार वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी दादाराव सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह डिसले, सरपंच आदेश कोळी , प्रा. अभिमान हंगरकर, सयाजीराव देशमुख, सुजित हंगरगेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले व तंत्रज्ञानातील नाविण्यपूर्ण प्रयोगशील व 14 आंतरराष्ट्रीय व 7 राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा ग्लोबल चेहरा म्हणून ओळखले जाणारे शिक्षक रणजितसिंह डिसले (जवळगाव ता. बार्शी) यांनी गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनीचे कौतुक करुन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डिसले म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात संधी मिळत असते परंतु त्या क्षेत्राचा शोध घेऊन विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास त्यातून हमखास यश मिळेल असे मत व्यक्त केले. 21 शतकात जगत असताना सुसंवाद साधणे, सृजनशिलता, क्रियाशिलता, कल्पकता व प्रचंड मेहनत घ्यायची तयारी असेल तर यश आपल्यापासून दूर नसल्याचे सांगून सर्वप्रथम तुम्हाला काय हवे आहे हे ओळखा, तुमची आवड आईवडिलांना सांगा, जगापेक्षा वेगळे करण्याची धमक ठेवा, तुमच्या आवडीचे क्षेत्र असेल तर तुम्ही अधिक प्रामाणिक राहता त्यासाठी प्रथम आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे आवाहन करुन देशाला सध्या एक चांगल्या शिक्षकाची, समाजसेवकाची, चांगल्या अधिकार्याची, चांगल्या नेत्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह डिसले, चि.अमित प्रकाश सोनवणे (पीएसआय पदी नियुक्ती), श्री.सागर राजकुमार घडमोडे.(गव्हर्नमेंट डिप्लोमा पदविका GDCSA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.),श्री.गुरुप्रसाद विश्वनाथ लोहार (विक्रिकर निरिक्षक पदी निवड.) यांना प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर
उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल काटीतील समस्त मुस्लिम बांधवांनी केरळ पुरग्रस्तांना मदत केल्याबद्दल मुस्लिम प्रतिनिधी म्हणून करीम बेग, विद्यासागर धोंडीबा ढगे (उत्कृष्ट उद्योग व्यवसाय पुरस्कार), चि.केतन अविनाशराव देशमुख (उत्कृष्ट कृतिशीलता पुरस्कार ), श्री.सुनील ढगे महाराज (अध्यात्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य), श्री. अभिमान लक्ष्मण हंगरकर (सामाजिक प्रेरणा पुरस्कार), श्री.चंद्रकांत जाधव सर (शैक्षणिक क्षेत्र कार्यासाठी) यांना काटी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर दहावी व बारावी मधील सर्व यशस्वी विद्यार्थी,विद्यार्थ्यांनीना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी मोफत पाणी पुरवठा केल्याबद्दल श्री.शिवाजी देशमुख, पाणपोईसाठी श्री. रामेश्वर लाडूळकर, मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी श्री.नवनाथ चंद्रकांत शिंदे ,व तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवडीबद्दल श्री.दयानंद जवळगावकर (गुरव), व सर्वं मुख्याध्यापक यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी दादाराव सावंत, पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले, सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सुर्यभान हंगरकर, सुजित हंगरगेकर, प्रा. अभिमान हंगरकर, पत्रकार उमाजी गायकवाड, अनिल गुंड, मकरंद देशमुख, भैरी काळे, मोतीराम आगलावे, सुहास साळुंके, प्रा. सौ. अनिता साळुंके, सौ. विजया पाटील, बाळासाहेब साळुंके, अन्वर पठाण, श्रावण वाघमारे, जुबेर शेख आदी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन भक्ती रविंद्र देशमुख या विद्यार्थीनीने केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुजी विचार मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.