काटी/प्रतिनिधी -
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. (11) रोजी सकाळी नऊ वाजता स्वर्गीय साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम आगलावे व सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष जुबेर हारुणमियाॅ शेख यांच्या सावित्रीबाई फुले मागावर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था. काटी, संचलित *मनाल प्री- प्रायमरी इंग्लिश मेडियम स्कूलचे उद्घघाटन करण्यात आले. गावापासून अगदी अर्ध्या किलोमीटर काटी-तुळजापूर रस्त्यालगत सुरू झालेल्या या स्कूलमुळे बाहेर गावी जाणाऱ्या विद्यार्थ्याची गावातच सोय होणार असल्याने पालकामधून समाधान व्यक्त केले जात आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या इंग्लिश स्कूलमध्ये प्लेग्रुप, नर्सरी, जुनियर के.जी., सिनियर के.जी. हे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, शालेय उपक्रम, विद्यार्थ्याच्या सर्वागिण विकासाकडे नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष जुबेर शेख यांनी सांगितले.
या उद्घघाटनप्रसंगी सरपंच आदेश कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम आगलावे, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, माजी बाजार समितीचे संचालक सुजित हंगरगेकर, करीम बेग, पत्रकार उमाजी गायकवाड, अनिल गुंड, मकरंद देशमुख, संस्थाचालक जुबेर शेख, हारुणमियाॅ शेख, अन्वर पठाण, रामेश्वर लाडुळकर,डॉ. युसूफ मुजावर, रशिद शेख, महिबुब शेख, बबन हेडे, अनिल बनसोडे, श्रावण वाघमारे आदी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
