प्रतिनिधी / उस्मानाबाद
|
| आमच्या जागेतील गोठा काढ असे म्हणून १ जून रोजी मारहाण झाली असून गुरुवारी (दि.६) वाशी पोलिस ठाण्यात परस्परविरुध्द ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. डोंगरेवाडी गावातील बस स्टँन्डवर गणेश दिलीप भराटे (रा. डोंगरेवाडी ता.वाशी) हे हरीश्चंद्र नरसिंग भराटे (रा. डोंगरेवाडी) यास आमच्या घरासमोरील आमच्या जागेतील गोठा काढ, असे म्हणाला असता नरसिंग भराटे, दादाराव भराटे, संदिप भराटे, हरीश्चंद्र भराटे (सर्व रा. डोंगरेवाडी) यांनी संगनमत करून गणेश भराटे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. गणेश भराटे यांचा भाऊ दिनेश भराटे भांडण सोडविण्यास आला असता त्यास संदिप भराटे याने दगडाने मारहाण केली. याप्रकरणी गणेश भराटे यांच्या एमएलसी जबाबवरून चार जणांविरुध गुन्हा दाखल झाला. तसेच याप्रकरणी दिनेश भराटे, गणेश भराटे, दिलीप भराटे (सर्व रा. डोंगरेवाडी) यांनी हरिश्चंद्र भराटे (रा.डोंगरेवाडी) यांच्याजवळ येवून आमच्या आमच्या जागेतील गोठा काढ, असे म्हणाले असता वरील आरोपींनी संगणमत करून हरिश्चंद्र भराटे यांना लोखंडी पाइपने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दिनेश भराटे, गणेश भराटे यांनी हरिश्चंद्र भराटे यांना डोक्यात मारहाण केली. याप्रकरणी हरिश्चंद्र भराटे यांच्या एमएलसीजबाबवरून वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला. |