प्रतिनिधी / तेर
उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपुर ग्रामपंचायतीतील विविध योजनांच्या निधीचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच मालन सौलंकर व ग्रामसेविका दीप्ती कुलकर्णी यांच्याविरुध्द ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे ग्रामसेवक दीप्ती कुलकर्णी यांनी सरपंच मालन सोलंकर यांच्या संयुक्त स्वाक्षरीने बँक खात्यातवरून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अंगणवाडी बांधकाम, ग्रामनिधी इर्ला दाऊतपूर रस्ता राज्यमार्ग पुल, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची भिंत बांधकाम, शाळा दुरुस्ती, ग्रामीण पाणी पुरवठा निधी अशा विविध विकासचा निधी ७६ धनादेशाद्वारे स्वत:च्या व नातेवाईकांच्या नावे नियमबाह्य एकूण ४१ लाख ११ हजार ४५० रुपये उचलून ग्रामसेवक व सरपंचाने शासन व कार्यालयांची दिशाभूल केली. याप्रकरणी सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्या फिर्यादीवरून ८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
Top