प्रतिनिधी / तुळजापूर 
शहरातील हडको भागात एका फर्निचरच्या दुकानाला अचानक लागलेल्या आगीत फर्निचर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. ७) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे ९ ते १० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा दुकानमालक नंदकुमार कालिदास पालखे यांनी केला आहे. 
तुळजापुरात हडको भागात दुपारी वाऱ्यामुळे महावितरणच्या तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने पालखे यांच्या दुकानातील भुश्याला आग लागली. दुपारच्या उन्हात आग वाढत जाऊन संपूर्ण दुुुकान आगीच्या भक्षस्थानी पडलेे. यामध्ये दुुुकानातील सागवानचे लाकडी दरवाजे, मशिनरी, पत्रे आदी साहित्य जळाले. माहिती मिळाल्यानंतर पोलिस, महसूल, महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
 
Top