उस्मानाबाद /प्रतिनिधी-
भारतीय जैन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल अजमेरा तर जिल्हा सचिवपदी सचिन गांधी यांची निवड एकमताने करण्यात आली. संघटनेचे राज्यध्यक्ष हस्तिमल बंब यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बैठकीत विविध उपक्रमांचे नियोजनही करण्यात आले.
नवीन कार्यकारिनी नियुक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी ही निवड करण्यात आली. बैठकीमध्ये उस्मानाबाद शहराध्यक्षपदी अॅड. रोहन कोचेटा, सचिव शितल बोराना यांची निवड झाली. तुळजापूर शहराध्यक्षपदी गुलचंद व्यवहारे, सचिव आनंद कंदले, महिलाध्यक्ष  वैशाली व्यवहारे, सचिव कल्पना व्यवहारे, उमरगा शहराध्यक्षपदी सचिन शेटगार, महिला शहराध्यक्षपदी डॉ. सुवर्णा पाटील, कळंब तालुकाध्यक्षपदी हर्षद अंबुरे, सचिव अमोल बाभळे, महिला तालुकाध्यक्ष राणी पांगळ, सचिव किर्ती अंबुरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बंब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा महिला अध्यक्षा कंचनमाला संगवे, अॅड. शांतीलाल कोचेटा आदींची उपस्थिती होती. शहरातील व्यापाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लहान व्यापाऱ्यांना व्यवस्थापन कौशल्य, संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन आदीबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच युवा पिढीला संस्कारित करण्यासाठी इम्पॉव्हरमेंट गर्ल्स या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.
 
Top