प्रतिनिधी/उस्मानाबाद -देशात सर्व ठिकाणी शांतता नांदावी महात्मा बसवेश्वराचे समतेच्या विचाराचे संवर्धन व्हावे यासाठी माजी राष्ट्रपती बी.डी. जत्ती यांचे सुपूत्र अरविंद जत्ती व त्यांच्या पत्नी शारदाताई जत्ती यांच्या पुढाकारातून महात्मा बसवेश्वराची १४ फुट उंच मुर्ती दि.१६ मे पासून पुणे ते बेंगलोर अशी संदेश यात्रा काढण्यात येत आहे. याचा समारोप दि.२६ जुन २०१९ रोजी बेंगलोर शहरात होणार आहे.
महात्मा बसवेश्वर यांचा शांतता संदेश यात्रोस राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. उस्मानाबाद येथ्े संदेश यात्रेचे वीरशैव जंगम मठ सांजा वेस गल्ली येथे आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी वीरशैव जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले, कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे, डॉ. अनंत राजमाने, चर्मकार महासंघाचे युवक प्रदेश अध्यख नितीन शेरखाने, आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, जय लहूजी संघठनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पेठे, डीसीसी बॅंकेचे माजी प्रभारी कार्यकारी संचालक हणुमंत भुसारे, अनिल जवळे, सदाशिव बोथे, अरूण कोरपे, अॅड. भाऊसाहेब बेलुरे, त्रिंबक कपाळे, दिलीप गुळवे, लताताई गुजरे, अनुताई पाळणे, आशाताई पाटील, महानंदाताई गुजरे, शशिकलताई पाचभाई, प्रतिभाताई मनकुदळे, अनिताताई गुळवे, संतोषीताई गुळवे आदींनी महात्मा बसवेश्वर शांतता संदेश यांत्रेचे स्वागत केले. वीरशैव जंगम मठ सांजा वेस गल्ली, उस्मानाबाद येथील मठात अरविंद जत्ती यांनी महात्मा बसवेश्वर यांचे मानवतावादी विचार, वचने व तत्वे यावर अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव जंगम मठ ट्रस्ट चे अध्यक्ष शिवानंद कथले व आभार प्रदर्शन त्रिंबक कपाळे यांनी मानले. यावेळी उस्मानाबाद शहरातील लिंगायत समाज व बसवप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.