उस्मानाबाद /प्रतिनिधी- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज बुधवार,दि.5 जून रोजी तुळजापूर तालुक्यातील रामदरा तलावाच्या परिसरात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, सामाजिक वनीकरण चे विभागीय वन अधिकारी श्री. बेडके,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख, तहसीलदार योगिता कोल्हे, तहसीलदार अभय म्हस्के, तहसीलदार राजकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद (लघुपाटबंधारे) श्री. जगताप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पसरटे, उपविभागीय वन अधिकारी श्री. पवार, वन अधिकारी श्री. घोडके, या सर्वांच्या उपस्थितीत पर्यावरण वृद्धीसाठी तसेच नजीकच्या काळात करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून सकाळी सहा वाजेपासून महसूल विभागातील ,सामाजिक वनीकरण विभागातील, जिल्हा परिषदेतील विविध विभागातील, जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून श्रमदान केले.
या श्रमदानातून सर्वांनी मिळून खड्डे खोदणे, चर खोदणे, दगडांचे बांध तयार करणे,अशी कामे केली. या कामात तुळजापूर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी,तुळजापूर सैनिकी शाळेचे सर्व अधिकारी कर्मचारी,तुळजापूर मंदिर संस्थानाचे सर्व अधिकारी कर्मचारी,सुरक्षारक्षक,पंचायत समितीतील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व स्वस्त
धान्य दुकानदार आणि स्थानिक गावकरी अत्यंत उत्साहाने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे एका महिला जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श समोर ठेवून प्रशासनातील अनेक महिला अधिकारी व कर्मचारीही या श्रमदानात हिरीरीने सहभागी झाल्या होत्या.