उस्मानाबाद/प्रतिनिधी-: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व जिल्हा क्रीडाअधिकारी संजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व उपयोगात नसलेल्या तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलामधील बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले,लातूर विभागीय क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे,जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, कैलास पाटील,शंकरराव बोरकर,सतीश सोमाणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप कार्यकारी अभियंता विलास गपाट,तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सहायक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे,मदन गायकवाड,शैलेंद्र माने,रमेश जगताप हे देखील उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी या बहुउद्देशीय इमारतीमधील हॉलमध्ये कबडडी, खो-खो, कुस्ती, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, ज्युडो, कराटे, तायक्वांदो आदी इनडोअर खेळ या हॉलमध्ये खेळता येणार आहेत, असे सांगितले तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट असल्यामुळे याचा खेळाडूंना निश्चित लाभ होईल, असे सांगितले. 
यावेळी नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही अनन्यसाधारण महत्व असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षणासाठी गुण व समृद्धी मिळविण्याची संधी असल्याचे म्हटले. तसेच अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील खेळाडूंसाठी बनविण्यात आलेला बहुउद्देशीय इमारत (बॅडमिंटन हॉल) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी उपलब्ध करून दिला व या हॉलमध्ये आतंराराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट तयार करून खेळाडूंना उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील खेळाडूंच्या कष्टांना यश येण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले.
          पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेली बहुउद्देशीय इमारत (बॅडमिंटन हॉल ) खेळाडूंना वाव मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व जिल्हा क्रीडाअधिकारी संजय महाडिक
 यांच्या पाठपुराव्यातून आंतराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट तयार केले गेले, खेळाकरिता मैदान तयार करून देण्यात आले, जिल्ह्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरिता आंतराष्ट्रीय दर्जाचे मैदान  उपलब्ध करून दिले, त्याबद्दल कौतुक करून राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त आर्या वाले व आरोही दीक्षित यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी योगेश थोरबोले,अजिंक्य वराळे,अनिल दांडगे,सुरेश कळंबकर,किशोर बोकरे,राम भुतेकर,अविनाश थोरबोले,दिनेश माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदक रवी केसकर तर आभार प्रदर्शन मदन गायकवाड यांनी केले.
 
Top