उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तेर-पानवाडी-आरणी ते जागजी या 11 मिलोमीटरचे जवळपास सात कोटीचे काम सुरू आहे. हे काम पानवाडी गावाजवळ कांही शेतक-यांनी अडविले असल्याची तक्रार ग्रामपंचायत ठरावासह पानवाडीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
या संदर्भात पानवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेर-पानवाडी-आरणी ते जागजी रस्त्याचे 11 किलोमिटरचे काम अजमेरा कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत सुरू आहे. हे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आले असून यासाठी जवळपास 70 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम तेर-पानवाडी-आरणी शिवेपर्यंत पूर्णत्वाकडे गेलेले आहे. पानवाडी गावाजवळ पश्चिमेला 500 मीटर काम कांही शेतक-यांनी अडविले आहे. या ठिकाणचा रस्ता खुपच अरूंद असून रस्त्याच्या एका बाजूस खुप खोल नाली आहे. दुस-या बाजूस काटेरी झांडाची रांग आहे. त्यामुळे मागील 30 वर्षापासून फक्त 10 फुट रस्त्यावरून गावकर-यांना शाळकरी मुलांना ये-जा करावी लागत आहे.
स्वातंत्र्य प्राप्तीस आज 75 वर्षे पुर्ण होत आहेत. तरी देखील पानवाडी ग्रामस्थांनी केवळ रस्त्यामुळे एसटी बसचे तोंड पाहिले नाही. अडवलेल्या रस्त्याचे काम मोजणी करून पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरूष, महिला, शाळकरी विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसवण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
 
Top