अणदूर /प्रतिनिधी-
मी काँग्रेसचाच आहे,काँग्रेसमध्येच राहाणार, आणि अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहूनच जनतेची कामे करणार असल्याचा खुलासा आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केला असून आपण भाजपामध्ये जाणार असल्याच्या बातम्याबाबत खंडन केले आहे.
      अणदूर येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी (ता.६) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की,मागील चार दिवसापासून सोशल मिडीयावर कांही खोडसाळ व विघ्नसंतोषी प्रव्रत्तीच्या लोकांकडून मी भाजपच्या वाटेवर,भाजपमध्ये जाणार अशा आशयांच्या पोस्ट टाकण्यात येत  आहेत.त्या पुर्णपणे निराधार व खोट्या आहेत.मी लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच मतदारसंघातील गावांत जावून जनावरांना चारा,पिण्याचे पाणी व रोजगाराविषयी जनतेशी चर्चा करुन आवशक तिथे प्रशासनाकडून मदत करण्याचा प्रयत्न करीत.जय- पराजय हा लोकशाहीचा भाग असून एका पराभवाने कुठलाही पक्ष संपत नसतो.त्यामुळे  गावोगावीचे पक्षाचे कार्यकर्ते, नागरिकांच्या सुख,दुखःच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे.आवशक तिथे बैठका घेवून कार्यकर्त्यांना या संकटसमयी आधार देण्याचे काम सुरु आहे.
     संपुर्ण राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना त्यांना मदत करायची सोडून  इतरांच्या पक्षांतरच्या बातम्या पसरविण्यातच कांही समाजसेवक गुंतले आहेत.काँग्रेस पक्षाने मला अनेक मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळें म्हणजे अन्य पक्षांत जाण्याचा प्रश्नच येत नाही.येत्या निवडणूकीतही मीच उमेदवार म्हणून जनतेसमोर जाणार आहे.तालुक्यातील जनतेमध्ये काँग्रेस बद्धल प्रचंड सहानुभूती असून जनता आमच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास आम्हाला आहे.अनेक कठीण प्रसंगातून मी गेलो आहे तरीही कधी विचलित झालो नाही. राजकीय स्वार्थासाठी मी कधीही पक्ष बदला नाही त्यामुळेच जनतेने मला पाचवेळा निवडून दिले आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता अशा शक्तींच्या विरोधात ताकदीने संघर्ष करावा असे आवाहन करुन आपल्या पक्षांतराच्या बातम्यांना पुर्णविराम दिला आहे.
 
Top