प्रतिनिधी/उस्मानाबाद-
शहराच्या वरूडा रोडवर असलेल्या डॉ.सुरेश करंजकर यांच्या घरावर व हॉस्पीटलवर १ जूनच्या पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान १० ते १२ जणांच्या टोळक्यांनी धाडसी दरोडा टाकून ४० ते ५० तोळे सोने व कांही रोख रक्कम दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत व मारहाण करीत लुटल्याची घटना उस्मानाबाद शहरात घडली आहे.शहरात दरोडा टाकून दरोडेखोरांनी पोलिसांना एक प्रकार चॅलेज दिले आहे, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
याबाबत पोलिस सूत्राकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, शनिवार दि.१ मे च्या पहाटे २ ते ३० च्या दरम्यान १० ते १२ टोळक्याच्या दरोडेखोरांनी आपली वाहने हॉस्पीटल पासून लांब लावून चालत हॉस्पीटलच्या गेटपर्यंत आले. त्यांनी हॉस्पीटलमध्ये प्रवेश करून सरळ त्यांनी तिसरे मजल्यावर असलेल्या डॉ.सुरेश करंजकर यांच्या निवासस्थनाचा दरवाजा तोडून त्याच्या निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी डॉ. सुरेश करंजकर व डॉ.सौ.शारदा करंजकर यांना जबर मारहाण करून कपाटाच्या व लॉकरच्या चाव्या घेतल्या. यावेळेस दरोडेखोरांनी काळे कपडे घातले होते. तर त्यांच्याकडे तलवार, चाकू, लोकडी गज अशा प्रकारचे शस्त्र असल्याचे सांगण्यात आले. डॉ.शारदा करंजकर यांनी पुतण्याच्या लग्नासाठी घरी दागिने आणून ठेवले होते. त्यामुळे एकुण १०० तोले सोने, कांही रोख रक्कम गेल्याचे सांगितले. घटनास्थळाला पोलिस अधिक्षक आर.राजा यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे श्वासन पथक ही मागविण्यात आले होते. या प्रकरणी आनंदनगर पुलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पथक रवाना
पुलिस अधिक्षक आर.राजा यांनी पी.व्ही.लोकराज्याला सांगितले की, सदर दरोडेखोरांची टोळी बाहेरच्या जिल्याची असून त्यांनी डॉ.करंजकर यांच्या हॉस्पीटलची रेखी करून नियोजनबध्द पध्दतीने दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांचा काही सुराग आमच्या हाती लागला असून त्या मार्गावर दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रवाना झाले आहे, असे सांगितले.