प्रतिनिधी/उस्मानाबाद-
प्रहार जनशक्ती पक्षाचे काम तळागाळातील गरजूवंचतापर्यंत जावून मदत करणारे असल्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्राला वाचा फोडून त्यास न्याय मिळवून देण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हयासह राज्यभरात उत्स्फुर्तपणे करण्यात येत आहे. जिल्हयातील मोठया मोठया प्रमाणात या संघठनेचे जाळे असून त्या माध्यमातून जनसेवेच्या कामाचा सपाटा सुरू असून येत्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर लोकसभा मतदारसंघातून या पक्षाच्या माध्यमातून निवडणुक लढवून ती जिंकणार असल्याचा निर्वाळा जिल्हयाचे प्रभारी जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२ जून २०१९ रोजी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लातूर जिल्हा सचिव तात्या सोनवणे, केदार सौदागर, तुळजापूर विधानसभा  अध्यक्ष अण्णाासाहेब दराडे, बालाजी जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना राजाभाऊ चौगुले म्हणाले की, जिल्हयातील जनशक्ती पक्षाचे काम अतिशय चांगले असून सध्याच्या कार्यरत कार्यकारिणीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यातील चांगले काम करणा-यांना राज्य व विभाग पातळीवर काम करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. त्यामुळे पुर्वीची कार्यकारिणी बरखास्त केली असून येत्या १५ दिवसात नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हयातील लोहारा तालुक्यातील लोकमंगल माऊली साखर, कारखान्याच्या संचालकांनी विशेषत: विद्यमान सहकारमंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांनी जानेवारी २०१९ पासून शेतक-यांनी कारखान्यास घातलेल्या ऊसाचा १ रूपयाही दिलेला नाही. त्यामुळे या कारखान्यावर हजारोंच्या संख्येने संघटनेच्या वतीने कारखान्याच्या चिमणीवर चढण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्हयात हेलीकॉफ्टर ने दौरा करते वेळी भरत कांबळे यांच्या घरावर हेलीकॉफ्टर कोसळले होते. यामध्ये कांबळे यांच्या घराचे नुकसान झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री निलगेंकर यांनी घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्ष संपले तरी घर बांधून दिले नसल्यामुळे आ. बच्चू कडू यांच्या आदेशाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साडे तीन लाख रूपयांचे घर बांधून कांबळे यांचे पुर्नवसन केले. शेतकरी अपंग व सुशिक्षीत बेकारांना मार्गदर्शन आदींसह विविध समाज उपयोगी कार्यक्रम या पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आले असून तुळजापूर तालुक्यातील १०८ गांवात १ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात आलेल्या आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील ३५० लोकांचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया या पक्षाच्या माध्यमातून मोफत केली असून ८०० नागरिकांना मोफत चष्मे व २५० निराधारांच्या पगारी सुरू केल्या आहेत.त्यास बरोबर ४२ जणांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळवून दिली असून इतर विविध समाज उपयोगी कामे या पक्षाच्या माध्यमातून केली असल्याचेही त्यांनी संागितले.
 
Top