लोहारा/प्रतिनिधी
मार्च2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी च्या परीक्षेत हायस्कुल लोहारा व वसंतदादा पाटील हायस्कूल लोहारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यशसंपादन केले आहे.
लोहारा शहरातुन हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थीनी शिवानी बेशकराव हिने 97.20% गुण मिळवुन प्रथम व वसंतदादा पाटील हायस्कुुल लोहारा शाळेतील विद्यार्थीनी हिंदवी जगदिश लांडगे 95.60% गुण मिळवुन द्वितीय तर हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थीनी मानसी सितापुरे 95% गुण मिळवुन तृतीय व वसंतदादा पाटील हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थीनी संजोत सुर्यवंशी 90 % गुण मिळवुन यश संपादन केले आहे. वसंतदादा पाटील हायस्कुल या शाळेचा निकाल 79.62 % लागला असून विशेष प्राविण्यासह आठ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 16 विद्यार्थी उत्तीर्ण होवुन यश संपादन केले आहे. तर हायस्कुल लोहारा शाळेचा निकाल 62.74% लागला असून विशेष प्रावीण्यासह 22 विद्यार्थी उत्तीर्ण, प्रथम श्रेणीत 45 विद्यार्थी प्रथम उत्तीर्ण झाले आहेत.
हायस्कुल लोहारा यशस्वी विद्यार्थी — बिराजदार मयुरी 89.60% गुण, भोंडवे स्वप्नाली 89% गुण, कुलकर्णी आकांक्षा 87.20% गुण, जट्टे मोनिका 87.20% गुण, सिरसाट मोनिका 86.60% गुण, शेख शाहिस्ता 85.40% गुण, फकीर अरबाज 85.20% गुण, लांडगे सिफा 84.40% गुण, कांबळे स्नेहा 84.30% गुण, होंडराव वैष्णवी 83.20% गुण,
मुल्ला जलाल इकबाल 83% गुण, जाधव संकेत 83% गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केले आहे.
वसंतदादा पाटील हायस्कुल लोहारा यशस्वी विद्यार्थी — गणेश जाधव 82.20% गुण, प्रतिक प्रमोद बंगले 79.60% गुण, शफिक सय्यद 78.20% गुण, प्राची दयानंद गिरी 77.40% गुण, आब्बास इन्नुस पटेल 76.40% गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे हायस्कुल लोहारा शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ, वसंत राठोड, सतिश जट्टे, सौ.सारीका पाटील (चिकटे), सदाशिव बचाटे, दयानंद पोतदार, विठ्ठल वचने पाटील, भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.प्रा.शेषेराव जावळे पाटील, वसंतदादा पाटील हायस्कुल मुख्याध्यापिका श्रीमती यु.व्ही.पाटील, यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
