प्रतिनिधी/लोहारा
थोर समाजसेवक,लिंगायत धर्म संस्थापक जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या समता आणि परिवर्तनवादी विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुणे ते बेंगलुरू बसव संदेश यात्रा निघालेली आहे.पुणे येथुन निघालेली हि यात्रा नाशिक,औरंगाबाद,जालना, परभणी,हिंगोली,नांदेड,लातुर,उस्मानाबाद, सोलापूर,सांगली,कोल्हापूर या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हि यात्रा पोहचणार आहे.यासोबत 14 फुटी उंचीची महात्मा बसवेश्वर महाराज यांची आकर्षक मूर्ती आहे.
माजी राष्ट्रपती बी.डी.जत्ती यांचे चिरंजीव अरविंद जत्ती यांच्या नेतृत्वाखाली यात्रा समन्वयक अविनाश भोसीकर यांच्या मार्गदर्शना खाली हि बसव संदेश यात्रा महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात फिरत असुन दि 9 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील आष्टा मोड येथे आली असता लोहारा तालुक्यातील समाज बांधवांनी भव्य स्वागत केले
यावेळी समन्वय समिती माजी अध्यक्ष नागन्ना वकील,सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे,कास्ती चे उपसरपंच महेश पाटील,परमेश्वर पाटील,बसव ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष विर फावडे,जेवळी(द)सरपंच चंद्रकांत साखरे,आपास भुजबळ, पै.धनराज भुजबळ,सोमनाथ वकील,मनोज कारभारी,हणमंत भुसाप्पा,दिपक गिराम,गजेंद्र सुतार,महादेव टेंगळे,यांच्यासह तालुक्यातील लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.