उस्मानाबाद /प्रतिनिधी:- २५१५ लेखशीर्षा योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सन २०१९– २०२० या वित्तीय वर्षात ५१५ लाख रुपयांच्या कामांना ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मंजुरी दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत सुरु केलेली लेखशीर्षा २५-१५ योजना ही ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची महत्वकांक्षी योजना असून या योजनेंतर्गत सन २०१९– २०२० या वर्षात राज्याच्या ग्रामविकास विभागाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दर्जोन्न्ती करण्यासाठी ग्रामीण भागातील ५१५ लाख रुपयांची मंजुरी दिलेली या जिल्हयाच्या विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून देण्यात आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यासाठी एवढा निधी मंजूर झालेला आहे. याआधी जिल्हयासाठी कधीही इतका निधी मंजूर झालेला नव्हता. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे,भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांचे भारतीय जनता पार्टी धाराशिव च्या वतीने प्र.का.सदस्य नितीन काळे,अँड.मिलिंद पाटील, अँड.अनिल काळे,अँड.खंडेराव चौरे,सुधीर पाटील,अँड व्यंकटराव गुंड,जिल्हा सरचिटणीस सतीश देेेशमुख, संताजी चालुक्य,जालिंदर मोहिते,प्रभाकर मुळे यांनी आभार मांडले.
