समुद्रवाणी /प्रतिनिधी-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, उस्मानाबाद यांच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान व औषधी वाटप शिबीर समुद्रवाणी येथे घेण्यात आले.
सततच्या दुष्काळामूळे होणाऱ्या आत्महत्या व दुष्काळाचा होणारा आरोग्यावरील वाईट परिणाम त्यामूळे ग्रामीण भागातील जनता असंख्य व्याधी घेवून जगत असतात. त्यातून पुढे मोठे दुर्धर आजार उद्भवतात. त्याला आळा घालण्यासाठी शहरातील नामवंत डाॅक्टरांच्या माध्यमातून समितीने हे शिबीर घेतले. या शिबिराच्या माध्यमातून 520 रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात स्त्री रोग, बालरोग, अस्थिरोग, मानसोपचार तज्ज्ञ, जनरल फिजिशीयन, नेत्ररोग इ. तज्ञ डॉक्टर शिबिरात होते.
प्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. आ.मधुकराव चव्हाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत डोलारे संचालक डीसीसी बॅक तर प्रमुख पाहुणे सरपंच शिवाजी पसारे, रामभाऊ गव्हाणे, राजाभाऊ शेरखाने, यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संजय सोनटक्के, डॉ. संतोष पाटील, डॉ. सुधीर सोनटक्के, डॉ. राहुल जेडगे. डॉ. रवींद्र पापडे, डॉ. रेखा टिके, डॉ.मनोज देव्हारे, डॉ. धनश्री झाडबुके, डॉ. प्रतिक्षा भरकड, डॉ. आशिष सिंह ह्या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा. मनोज पसारे, भारत काटे, विष्णू ढवळे, सोमनाथ मनसुळे, गणि मेंढके, नागोराव ढोबळे, तुकाराम जाधव, राजाभाऊ ढवळे, पंडीत हनुमंते, पापा आत्तार, आरीफ शेख आदींनी परिश्रम घेतले.
या शिबीरासाठी ग्रामस्थ व परिसरातील गरजू मोठय़ा संख्येने उपस्थित होते.